नवे दानवाड येथे संजय धनगर यांच्याकडून मुस्लीम बांधवांना इफ्तार पार्टी


प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

रमजान ईदच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजातील बांधवांसाठी इफ्तारी पार्टीचे आयोजन करून माजी सरपंच संजय धनगर यांनी समाजिक बांधिलकी जपली आहे.

प्रत्येक वर्षी मुस्लिम समाजाकरिता ईदच्या पवित्र महिन्यात माजी सरपंच संजय धनगर हे कधी खजूर तर कधी साखर वाटप करून सामाजिक बांधिलकी जपतात त्यांचे हे प्रेम समाजात कायम राहील् व समाजाचे प्रेम ही त्यांच्यावर कायम राहील तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते कायम तत्पर राहतात. गावातील विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांचे विशेष असे लक्ष असते, हनुमान जयंतीलाही त्यांनी महाप्रसादाचे स्वतः दोन वेळा आयोजन केले होते. आजच्या इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष