इचलकरंजीत गोंधळी जोशी वासुदेव समाजाचा मेळावा
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
इचलकरंजी शहर गोंधळी, जोशी, वासुदेव समाज वधू वर सूचक मंडळाच्या वतीने वधू-वर पालक परिचय मेळावा व मोफत विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 2 एप्रिल रोजी श्रीमंत ना.बा. घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे संपन्न होणार आहे.
यावेळी माहिती देताना वधू वर सूचक समितीचे संस्थापक अध्यक्ष महेश भिसे म्हणाले, प्रति वर्षी प्रमाणे इचलकरंजी शहर गोंधळी जोशी वासुदेव समाज वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. कोल्हापूर सांगली सातारा आणि कर्नाटक सीमा भागातील समाज बांधवांची ओळख निर्माण व्हावी व त्यातून शुभ कार्य घडावेत या उद्देशाने या वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. त्याचबरोबर मेळाव्यात ठरणाऱ्या नवदापत्ययांचा मोफत विवाह करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक भागातील समाजातील विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या प्रमुखांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे गोंधळी जोशी वासुदेव बागडी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हा मेळावा यशस्वी करण्याकरिता रवी वासुदेव, अनिल दुर्वे, शंकर दातोंडे, रत्नाकर विटेवरी, अविनाश वासुदेव, नरेश धुमाळ, गोविंद शिंदे, शंकर धातुंडे, विजय काळे, संजय भोसले आदींसह समाजबांधव परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा