बोर्ड काढून आमदारांची विकासकामे पुसली जाणार नाहीत : संजय पुजारी

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून हेरवाड येथे शिवशैल हॉल ते श्री संतुबाई मंदिरपर्यंत डांबरीकरण करण्यात आले आहे. या कामाचा फलक या ठिकाणी लावण्यात आला होता, मात्र काही वाईट मनोवृत्तीच्या लोकांनी सदरचा बोर्ड काढून परत त्याची रंगरंगोटी करून आपल्या नेत्याचे नांवे घालून दुसर्‍या ठिकाणी लावून आपली खराब वृत्ती दाखवून दिली आहे, लवकरच यातील सत्य सर्वांच्यासमोर आणणार असल्याची माहिती युवा नेते संजय पुजारी यांनी पत्रकारांना दिली. 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून हेरवाड मध्ये अनेक विकासकामे झालेली आहेत. येथील शिवशैल हॉल ते श्री संतुबाई मंदिर पर्यंतचा रस्ता करण्यात आला आहे. या कामाचा बोर्ड संबधित ठेकेदाराने लावला होता, मात्र काही अविकसित विचाराच्या लोकांनी सदरचा बोर्ड काढून पुन्हा पेंटिंग करून दुसऱ्या ठिकाणी लावला आहे, असे केल्याने केलेली विकासकामे पुसली जाणार नाहीत, त्यामुळे लवकरच या संबंधी आमदार यड्रावकर यांची भेट घेवून संबंधित व्यक्तींचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे पुजारी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष