घोडावत-स्विनबर्न विद्यापीठाचा सामंजस्य करार

 प्रोग्रॅम आर्टिक्युलेशन व संशोधनासाठी पुढाकार

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

संजय घोडावत  विद्यापीठ व  स्विनबर्न विद्यापीठ मेलबर्न, ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रोग्रॅम आर्टिक्युलेशन व दर्जेदार आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी सामंजस्य करार झाला.यावर स्विनबर्नचे प्रो.अलेक्स स्टोजोवस्की व कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी सह्या केल्या. 

      याविषयी कुलगुरू म्हणाले,की घोडावत विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग विद्यार्थ्यांना या कराराचा फायदा होईल. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग (रिन्यूएबल एनर्जी), इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग अशा विषयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केल्यास व एक वर्ष पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्विनबर्न विद्यापीठात प्रोग्राम आर्टिक्युलेशन अंतर्गत उर्वरित शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळेल. यामध्ये शिक्षणातील नियम अटी शिथिल करून खास फी मध्ये सवलत देण्यात येईल.

       याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक,स्विनबर्न विद्यापीठातील सायन्स,कॉम्प्युटिंग आणि इंजिनिअरिंग विभागाचे डीन प्रो.अलेक्स स्टोजोवस्की म्हणाले, की कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय घोडावत विद्यापीठ शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर होत आहे.एका सक्षम विद्यापीठाबरोबर हा सामंजस्य करार होत असल्याबद्दल मला समाधान वाटते. हा करार आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठाला नवी ओळख प्राप्त करून देईल. प्रोग्राम आर्टिक्युलेशनमुळे विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेता येईल.विश्वस्त विनायक भोसले यांनी स्विनबर्न विद्यापीठातील भेटीदरम्यान घोडावत विद्यापीठाच्या यशाबद्दल माहिती दिली असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

        यावेळी स्विनबर्नचे डॉ. जयदीप चंद्रण,विश्वस्त विनायक भोसले,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव,प्रा. सरिता पाटील उपस्थित होते.यासाठी प्रा.संजय इंगळे,अमृता हंडूर यांनी विशेष कष्ट घेतले.

        प्रोग्राम आर्टिक्युलेशन व संशोधन क्षेत्रासाठीच्या या कराराबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष