हेरवाडला कायमस्वरूपी तलाठी न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार : बंडू पाटील

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या अनेक महिन्यांपासून गावाला कायमस्वरूपी तलाठी नसल्याने शेतकरी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे, वारंवार सांगूनही तात्पुरता कार्यभार स्विकारलेले तलाठी येत नाहीत त्यामुळे शेतकरी वर्गाला विविध कागदपत्रांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत गावाला कायम स्वरूपी तलाठी न दिल्यास तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, हेरवाडमध्ये तलाठी कार्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्ण वेळ तलाठी नाही. हेरवाडला पूर्ण वेळ तलाठी द्यावा, अशी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

 येथील रहिवाशांना सातबारा, फेरफार, सातबाऱ्यावर नाव लावणे, उत्पन्नाचा दाखला काढणे अशा विविध महसुली कामांसाठी तलाठी कार्यालयात जावेच लागते. परंतु, या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार शिरढोण येथील तलाठी रवी कांबळे यांच्याकडे दिलेला आहे. मात्र हे तलाठी वेळेवर येत नसल्यामुळे येत्या दोन दिवसांत गावाला कायम स्वरूपी तलाठी न दिल्यास तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष