महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा आकडा 11 वर, मृतांची यादीत महिलांची संख्या अधिक; यादी जाहीर
मुंबई :
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 11 वर गेला आहे. तर अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ आहेत. नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या श्रीसेवकांवर उपचार सुरू आहेत. कडक उन्हात दोन तास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने या श्रीसेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यातील 11 जण दगावले. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.
मृतांची नांवे खालील प्रमाणे -
01. तुळशीराम भाऊ वागडे वय 58, जांभूळ विहीर ता. जव्हार
02. जयश्री जगन्नाथ पाटील वय 54, रा. वारळ पो. मोदडी ता. म्हसळा
03. महेश नारायण गायकवाड वय 42, रा. मेदडू ता. म्हसळा
04. मंजुषा कृष्णा भोगडे, रा. भुलेश्वर मुंबई
05. भीमा कृष्णा साळवे, वय 58, रा. कळवा ठाणे
06. सविता संजय पवार, वय 42, रा. मंगळवेढा, सोलापूर
07. स्वप्नील सदाशिव किणी, वय 32, रा. विरार
08. पुष्पां मदन गायकर, वय 63. कळवा, ठाणे
09. वंदना जगन्नाथ पाटील, वय 62, रा. माडप. ता. खालापूर
10. कलावती सिद्धराम वायचल, रा. सोलापूर
11 अनोळखी आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा