कर्नाटक सरकारची अतिरिक्त दोन टीएमसी पाण्याची मागणी राज्य सरकारने मान्य करू नये : वैभव उगळे
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
पावसाळ्यात कर्नाटक सरकार पाणी घेत नाही त्यामुळे आम्हाला महापुराशी सामना करावा लागतो तर उन्हाळ्यात आमच्या नद्या कोरड्या पडतात आणि आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागते. कर्नाटक सरकारने आता उन्हाची झळ बडवू लागली आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारकडे अतिरिक्त दोन टीएमसी पाण्याचा साठा मागणी केली आहे. ती मागणी राज्य सरकारने मान्य करू नये अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
दरम्यान उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडत आहे. त्यामुळे सीमेलगतच्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्राने कृष्णा नदीतून हिप्परगी बंधाऱ्यात दोन टीएमसी अतिरिक्त पाणी सोडावे असे विनंतीचे पत्र बेळगावचे विभागीय आयुक्त गौतम बगादी यांनी राज्य सरकारला पाठवले आहे.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख उगळे म्हणाले सन 2019 आणि 2021 सालच्या अतिवृष्टीमुळे कृष्णा पंचगंगा नद्यांना महापूर आला होता. कर्नाटक सरकारच्या अडमुठे धोरणामुळे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्याने पश्चिम महाराष्ट्राला सर्वात जास्त शिरोळ तालुक्याला महापुराचा सामना करावा लागला आहे.आम्ही येथे पाण्याने होरपळत असताना त्यावेळी कर्नाटक सरकारला त्यावेळी दया का आली नाही असा सवाल उपस्थित करत.
तालुकाप्रमुख उगळे पुढे म्हणाले पंचगंगा नदी सध्या पूर्ण क्षमतेने अटली असून कृष्णा नदीच्या बॅक वॉटरच्या पाण्याने पंचगंगा नदी उलटी प्रवाहित केली आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतीला थोड्याफार प्रमाणात पाणी मिळत आहे. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा कृष्णा या दोन्ही नद्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मात्र कर्नाटक सरकार वारणा आणि कोयना नदीच्या पाण्यावर डोळा ठेवून बेळगाव- बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठी असणाऱ्या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.असा भावनिक मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्राने वारणा तसेच कोयना धरणातून हिप्परगी बॅरेजमध्ये तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.राज्य सरकारने कर्नाटक सरकारची मागणी मान्य करू नये अन्यथा शिरोळ तालुक्याच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील,माजी तालुकाप्रमुख दयानंद मालवेकर,उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे ,युवा सेना प्रमुख प्रतीक धनवडे,निलेश तवंदकर,राहुल काकडे, किरण देसाई, राजू पाटील, विकास सुतार,मंगलताई चव्हाण, वैशाली जुगळे, ,आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा