हेरवाडचा श्लोक पाटील राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तिसरा
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
समृद्धी प्रकाशनच्यावतीने घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत नृसिंहवाडी येथील कुमार विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी श्लोक विजय पाटील (रा. हेरवाड) याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
श्लोक विजय पाटील हा नृसिंहवाडी येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत आहे. समृद्धी शैक्षणिक प्रसारक संस्था पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशनच्यावतीने 26 फेब्रुवारी रोजी मजरेवाडी येथील केंद्रीय शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून श्लोक विजय पाटील रा. हेरवाड यांनी 200 पैकी 194 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल शिक्षणप्रेमीतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. श्लोक पाटील याला वर्गशिक्षिका वैशाली पाटील, मुख्याध्यापिका विजया पाटील यांचे मार्गदर्शन तर सरोजिनी खड्ड, विजय नरसगोंडा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा