अरविंद मजलेकर यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा सत्कार व सेवा गौरव विशेषांकांचे प्रकाशन

दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :

शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारातील कार्यरत असणारे अभ्यासू व जाणकार व्यक्तिमत्व, साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन, दक्षिण भारत जैन सभा,कर्मवीर पतसंस्था इत्यादी संस्थेचे आधारस्तंभ,कुमार विद्या मंदिर नं.2 शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरविंद दादा मजलेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सदिच्छा सत्कार व सेवा गौरव विशेषांकाचे प्रकाशन आमदार डॉ.राजेंद्र पाटील यांचे शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला.

         स्वागत व प्रास्ताविक विजय भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मजलेकर सरांचे गुरू,पहिले मुख्याध्यापक या सर्वांचा आमदार डॉ. राजेंद्र पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन महेश घोटणे यांनी केले.

        बेस्ट स्टुडंट अवॉर्ड१००० रुपये रोख व सन्मानपत्र देण्याची घोषणा आजच्या प्रसंगी करण्यात आली. कु.मृणाल कुबेर गावडे,चि.राजवर्धन संपत चव्हाण हे या वर्षीचे मानकरी ठरले.

          सत्कारमूर्ती अरविंद मजलेकर म्हणाले,-संपूर्ण सेवा शिरोळ तालुक्यात झाली. जांभळी,कोंडिग्रे,टाकवडे, दत्तनगर,जैनापूर,दत्तनगर -कबनूर,धरणग्रस्त दानोळी,दानोळी या गावात सेवा बजावली.माझ्या जीवनात आनंदाचे क्षण मुलांच्यामुळे मिळाले.वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वीर सेवा दलाचे अध्यक्ष म्हणून काम करताना शाकाहार,सहकार समजला.सगळा वेळ शाळा, समाज व सहकारावर खर्च झाला.धर्मपत्नीने आई - वडीलांची सेवा केल्याने मला अधिक वेळ समाजाप्रती देता आला.आयुष्यात सहकार्य केलेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

        प्रमुख पाहुणे -आमदार डॉ. राजेंद्र पाटील म्हणाले -जिल्हा परिषदेच्या शाळा चालविणे कठीण काम आहे.इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत पालकांची मानसिकतेत शाळा चांगली चालविली,कर्मवीर पतसंस्था, साने गुरूजी पतसंस्था व्यवस्थित चालविल्या. नेतृत्वगुण कसे असावेत? याची चुणूक दाखविली.अनेक शाळांना उर्जितावस्था आणल्या. बेस्ट स्टुडंट अवॉर्डची घोषणा केली.शासनाच्या रक्तदान शिबीरात मोलाचे योगदान दिले.त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

        लेखापरीक्षक महेश धर्माधिकारी,सुनिल एडके,राजू जुगळे,रविकुमार पाटील,डी.ए.पाटील,निर्मला कोळी,राजगोंडा पाटील,एम.के. चव्हाण,राजोबा सर,एम.ए. यादव,भारती कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.

      प्रमुख पाहुणे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे शुभहस्ते सत्कार संपन्न झाला. अध्यक्षस्थानी केडीसीसी बँक संचालक,प्राचार्य अर्जुन आबिटकर हे होते.प्रमुख उपस्थितीमध्ये गटविकास अधिकारी -शंकरराव कवितके, गटशिक्षणाधिकारी -भारती कोळी,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील,कर्मवीर मल्टी स्टेटचे व्हा.चेअरमन सुकुमार पाटील, वीर सेवा दलाचे चेअरमन - बाळासाहेब पाटील,चिपरीच्या सरपंच निर्मला कोळी,प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल एडके,साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे व्हा.चेअरमन -मेहबूब मुजावर,तेजस पब्लिकेशनचे संपादक रावसाहेब पुजारी,साने गुरुजी पतसंस्थेचे संस्थापक - आदगोंडा पाटील,लेखापरीक्षक - महेश धर्माधिकारी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभयकुमार वाळकुंजे,सुरेश पाटील,दिलीप पाटील,शरद सुतार,लक्ष्मण कबाडे,प्रकाश नरुटे,संपत कोळी,दिलीप शिरढोणे, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,पतसंस्थांचे पदाधिकारी,केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक, पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

     कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष -अभयकुमार वाळकुंजे,उपाध्यक्ष -रेखा बिनीवाले,सदस्य यांनी अविरत कष्ट घेवून समारंभ यशस्वीपणे करून दाखविले.मानपत्र देवून सत्कार समारंभाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश घोटणे,किरण पाटील, सुरेखा कुंभार यांनी केले. आभार सुरेश पाटील यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष