कुरुंदवाड : रघुनाथ सावंत यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

         नवभारत शिक्षण मंडळ सांगली व श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेली 39 वर्ष काम करून सेवानिवृत्त होत आहेत. यांच्या सेवानिवृत्तीचा व शुभेच्छा समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

       श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड चे प्राचार्य आर्.जे .पाटील सर यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. सत्कारमूर्ती आर.जी सावंत यांचा शालेय समिती पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ या सर्वांच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन प्रा.आर.आर. टाकमारे यांनी केले.

   नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे कार्यकारी सदस्य मा.श्री. शिवाजी पाटील दादा यांनी  श्री व सौ.आर जी सावंत यांचे संस्थेसाठी असणारे योगदान 39 वर्षांमध्ये प्रमाणिक व एकनिष्ठ पणे केलेली कामे, पी.बी. पाटील साहेब व माई यांच्या समवेत केलेलं काम अशा अनेक गोष्टींना उजाळा दिला.

     या सत्कार प्रसंगी माजी प्राचार्य व शालेय समितीचे कार्याध्यक्ष मा.श्री.अण्णासाहेब गणपती माने-गावडे सर यांची शिरोळ नगरपालिका या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने व शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले रघुनाथ गणपती सावंत यांनी 1985 पासून आमच्या सर्व शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने या महाविद्यालयासाठी काम केलेलं आहे. त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

   महाविद्यालयातील शिक्षक जाधव सर, म्हस्कर सर, भोजे सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समिती चेअरमन आदरणीय रावसाहेब पाटील मामा बोलताना म्हणाले आमच्या महाविद्यालयास रघुनाथ सावंत व त्यांच्या सौ गीता वहिनी या दोघांचंही खूप मोठ योगदान लाभलेले आहे.तुम्हा दोघांचं प्रेम असच महाविद्यालयावर राहू दे त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्था पदाधिकारी,शालेय समिती सदस्य घोरपडे वहिनी, प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सावंत परिवार अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक मा.श्री.गौतम भाऊ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रा. डी.एन. बिरादार सर यांनी केले व सूत्रसंचालन टी.बी.माने मॅडम व एस. डी.म्हस्कर सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष