कन्या विद्या मंदिर हेरवाड शाळेचे एसटीएस परीक्षेमध्ये उत्तुंग यश
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत कन्या विद्या मंदिर हेरवाडच्या विद्यार्थीनींनी उत्तुंग यश संपादन केले आहे.
यामध्ये इयत्ता पहिली मधील श्रीशा राजेंद्र आरगे ९० गुण केंद्रात तिसरी, इयत्ता दुसरी दिव्या सचिन माळी 98 गुण मिळवून राज्यात दुसरी, राजनंदनी नितीन मोहिते 96 गुण राज्यात तिसरी, स्वराज जितेंद्र कोकणे 94 गुण केंद्रात प्रथम, आलिया अझरुद्दीन मुल्ला 94 गुण केंद्रात प्रथम, आदिती युवराज पाटील 90 गुण केंद्रात तिसरी, इयत्ता तिसरी, सृष्टी सुनील माने 176 गुण केंद्रात दुसरी, अमृता अरविंद पाटील 162 गुण प्राविण्य पात्र, इयत्ता चौथी, हिंदवी अर्जुन जाधव 176 गुण केंद्रात तिसरी आली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थीनींना मुख्याध्यापक सुभाष तराळ व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा