कोळी दांपत्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न



कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कुमार विद्या मंदिर नं.३ कुरूंदवाडचे विषय शिक्षक संजय आण्णा कोळी व राजर्षि शाहू विद्या मंदिर नं. १ शिरोळ च्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. बेबी संजय कोळी यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न झाला.

          राजर्षि शाहू विद्या मंदिर शिरोळ व कुमार विद्या मंदिर नं. ३ कुरुंदवाड तसेच मित्रमंडळी,नातेवाईक यांच्या वतीने सत्कार करणेत आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक कोळी होते.

      सेवानिवृत्ती समारंभास माजी नगराध्यक्ष जयराम पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, भगवान कोळी,रविकुमार पाटील,सुनिल एडके, विठ्ठल भाट,शिरोळच्या नगरसेविका सुरेखा पुजारी,स्नेहल पाटील, रमेश पाटील,रामा माने,संजय माने,विलास लोंढे,मोअज्जम चौगले, मेहबूब मुजावर,दिलीप शिरढोणे यांच्यासह शिक्षक वर्ग, मित्रमंडळी,नातेवाईक उपस्थित होते.

       प्रास्ताविक बाळासो कोळी यांनी केले तर आभार किरण माने यांनी मानले. सूत्रसंचलन शंकर दिवटे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष