सैनिक टाकळी कन्या विद्या मंदिर शाळेचे छत दुरुस्ती व श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल संगणक कक्ष उद्घाटन सोहळा संपन्न
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
सैनिक टाकळी येथील कन्या विद्या मंदिर शाळेचे छत दुरुस्ती करण्यासाठी बेटल फाउंडेशन इंडिया 50 बैच यांच्या अनमोल सहकार्यातून कन्या विद्या मंदिर सैनिक टाकळी शाळेचे छत दुरुस्ती करण्यात आले.
त्यासाठी विशेष प्रयत्न श्रीमंत. भवानीसिंग मोलोजीराव घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम पूर्ण करण्यात आले .तसेच श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल सैनिक टाकळी यांचे संगणक कक्ष उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी उपस्थित सौ. कानन पटेल मॅडम .(क्रिएटिव्ह चेंज ग्रुप पुणे, )सौ .प्रणाली सर पोतदार मॅडम (समाजसेविका) पुणे.श्री .अभिषेक मोहिते (उद्योगपती )कोल्हापूर. वैशाली वर्णेकर. हेमंत पुराणिक. श्रीमंत. भवानी सिंग घोरपडे .श्री महेश नेताजी तांबेकर सर. सैनिक टाकळी माजी सरपंच. श्रीधर भोसले .संतोष गायकवाड. शेखर पाटील .तसेच कन्या विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक .शिक्षिका ,शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मुख्याध्यापक. शिक्षक, शिक्षिका, व विद्यार्थी वर्ग सैनिक टाकळीतील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा