हेरवाड ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे १० एप्रिल पासून काम बंद आंदोलन
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायत कर्मचारी १० ते १३ एप्रिल या कालावधीत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन सरपंच रेखा जाधव यांना दिले आहे. 
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील एकूण २७९२० ग्रामपंचायत मधील एकूण कर्मचारी संख्या ६०००० असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बऱ्याच वर्षापासून अनेक मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित असून त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पी एन ५१३९ च्या वतीने काम बंद आंदोलन करत आहे. जी कामे नगरपरिषद नगरपंचायतीचे कर्मचारी करतात. तीच कामे स्थानिक नागरिकांचे सोयीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी करीत असतात. तरीही त्यांना किमान वेतन शासनाकडून दिले जाते तेही ५० टक्के. त्यावरती कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी या महागाईच्या निर्देशानुसार फार कठीण असून याआधीही काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्यासुद्धा केलेल्याची उदाहरणे आहेत.
कलम ६१ रद्द करणे अथवा सुधारणा करणे, अभय यावलकर समितीच्या शिफारशी नुसार वेतनश्रेणी लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे किमान वेतनासाठी उत्पन्नाचे अट रद्द करणे, उपदान योजनेच्या जाचकटी रद्द करणे व सरसकट सर्वच ग्रामपंचायत कर्मचारी यांना उपदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निर्णय घेणे, ग्रामपंचायत कर्मचारी यांना १० ऑगस्ट २०२० पासून किमान वेतन सुधारणा लागू असून शासनाने १ एप्रिल २०२२ पासून लागू केले आहे त्यातील २० महिन्याचा फरक मिळावा, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह खाते कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन या कार्याकडे वर्ग करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी आकृतीबंध सुधारणा करणे, २०२३ ला होणारी मेगा भरतीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांचेमधून वर्ग ३ व ४ ची पदे तत्काळ भरती करणेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मधून जिल्हापरिषद भरतीसाठी वर्ग ड ची पदे भरण्यास मान्यता देणे जिल्हा परिषद सेवेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मधून वर्ग ३ व ४ ची पदे तत्काळ भरती करण्यासाठी मान्यता मिळणे आदी मागण्या शासनापुढे संघटनेने ठेवल्या आहेत. त्या अभय यावलकर समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत कर्मचारी यांना नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांचे प्रमाणे वेतन श्रेणी लागू करणे आवश्यक असून राज शासन ग्रामपंचायत कर्मचारी यांचे न्यायिक हक्काच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. त्यासाठी १० ते १३ एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व ग्रामपंचायतमधील चार दिवस काम बंद ठेवून ग्रामपंचायत कर्मचारी संपावर जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
यावेळी सुरेश पाटील, अमोल देबाजे, आण्णासाहेब कुंभार, कऱ्याप्पा बरगाले, संजय गायकवाड, सिंधूताई ढाले, यल्लाप्पा कांबळे, प्रमोद कांबळे, लखन माने, मनोज शिंगे, उत्तम कांबळे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा