चंद्रप्रकाशजी छाजेड मारवाडी जिल्हा भूषण पुरस्कारने सन्मानित
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
मैत्री फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अध्यक्ष चंद्रप्रकाशजी छाजेड यांचा मारवाडी जिल्हा भूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचच्या नवव्या प्रातींय अधिवेशनाच्या भव्य कार्यक्रमात चंद्रप्रकाश छाजेड यांचा सन्मान करणेत आला. तसेच इचलकरंजी तेरा पंथ सभा, तेरापंथ युवा परिषद मारवाडी युवामंच, मैत्री फौडेशन, पावरलुम क्लॉथ यार्न मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातुन चंद्रप्रकाश जी सेवा कामात अग्रेसर असतात. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरात सर्वांची काळजी घेऊन सर्वाना मदत, जेवण देणे, अशा कार्यात चंद्रप्रकाश यांचा मोठा हातभार सहकार्य होते. कोरोना महामारी वेळात सर्वाना खाद्यपाकीटे,, औषधे, डॉक्टर उपलब्धता, ऑक्सीजन मशीन साठी व्यवस्था, तसेच वृध्दाश्रम व अनाथाश्रमा मधे सर्व सोई पुरवणे, गोशाळेसाठी मदत, सेवाभारती दवाखान्यासाठी जेवण व नाष्टा सोय, गरिब विद्यार्थी च्या साठी शैक्षणिक मदत अशा अनेक समाजउपयोगी कार्यात चंद्रप्रकाश यांचा हातभार सहकार्य मोलाचे आहे. तसेच उन्हाळयात पाणी वाटप, पाणपोई देणे या कामात त्यांचे मोलाचे सहकार्य आहे.
या सर्व कामाची दखल म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनात त्यांना मारवाडी जिल्हा भुषण पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमास मारवाडी युवा मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री, सुरेन्द्र जी भट्ट यांची उपस्थिती होती. तसेच प्रांतचे वरिष्ट मार्गदर्शक पुर्व मंत्री रमेशजी बंग, पुर्व मंत्री जयप्रकाशजी मुंदडा, विरेंन्द्रजी धोका यांच्या उपास्थितीत हा कार्यक्रम संप्पन झाला. यावेळी शंकराचार्य, साध्वी पुष्पाजी यांचा आर्शिवाद मिळाला.
या कार्यक्रमास केंद्रिय मंत्री कैलाशजी चौधरी, भागवतजी कराड तसेच मंत्री अतुलजी सावे, संदीपान भुमरेजी यांची उपस्थिती होती. चंद्रप्रकाश यांचा संदीपान भुमरेजी व पुर्व मंत्री राजेश जी टोपे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सन्मान करणेत आला. या कार्यक्रमास मारवाडी युवामंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, रामकिशोरजी वर्मा, रामदेवजी राठी, प्रेमसिंगजी चौहान, जुगलजी बियाणी, माजी अध्यक्ष तसेच प्रांतीय संयोजक, चेतनजी दायमा, हरीशजी झंवर प्रांतीय संयोजक, विनोदजी पुरोहीत या सर्वांची उपस्थिती होती.
या पुरस्काराबद्दल मैत्री फौंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाशजी छाजेड यांचे सर्वत्र कौतुक होत असून परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा