वर्ड पॉवर चॅम्पियनशीप राज्यस्तरीय स्पर्धेत अब्दुर्रहमान वसीम पटेल उपविजेता
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मुंबई येथे झालेल्या वर्ड पॉवर चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धेत उर्दू विद्या मंदिर औरवाडचा विद्यार्थी व डीसीपीएससंघटनेचे कार्याध्यक्ष वसीम पटेल यांचे चिरंजीव- अब्दुर्रहमान वसीम पटेल हा उपविजेता बनला.LFW चे संस्थापक प्रणिल नाईक सर आणि इडेलजीव्ह फौंडेशन मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. नगमा मॅडमनी अब्दुर्रहमानला खास भेटवस्तू देवून कौतुक केले.
औरवाडसारख्या ग्रामीण भागातील विशेष म्हणजे उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांने राज्यस्तरावरील स्पर्धेत उपविजेता ठरल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.यासाठी मार्गदर्शक शिक्षिका -बिस्मिल्लाह आयुब मुजावर मॅडम, त्याची आई -शाईस्ता मॅडम,वडिल- वसिम पटेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापिका जकिया मोअज्जम चौगले,मोअज्जम बुखारी,नसरीन करीमखाँ,केंद्रप्रमुख रियाजअहमद चौगले, शिक्षण विस्तार अधिकारी मुसा सुतार,अनिल ओमासे,दिपक कामत व गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांचे प्रोत्साहन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा