नवे दानवाड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रल्हाद सांळुखे / शिवार न्यूज नेटवर्क :

प्रतिवर्षाप्रमाणे नवे दानवाड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 दि. १० रोजी सकाळी १० वाजता सम्राट अशोक यांचे प्रतीमेचे फोटो पुजन,व ग्राम स्वच्छता अभियान,व रात्री ८ वाजता हिप्नॉडिझमचा कार्यक्रम संपन्न झाला. दि.११ रोजी सकाळी ९ वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी १० वाजता धावने स्पर्धा, ११ वाजता स्लो सायकल स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता हातगाडी स्पर्धा, रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, दि,१२ रोजी सकाळी ९ वाजता सर्व महापुरुषांच्या प्रतिमेच पुजन, सकाळी १० वाजता सायकल स्पर्धा,११ वाजता रांगोळी स्पर्धा, सांयकाळी ४ वाजता चित्रकला स्पर्धा, रात्री ८ वाजता आयु. संभाजी कांबळे यांचे व्याख्यान, दि,१३ रोजी सकाळी नऊ वाजता सर्व महापुरुषांचे प्रतिमेचे पुजन, सकाळी १० वाजता होममिनीस्टर कार्यक्रम (स्त्रियांसाठी) रात्री ८वाजता भिमवंदना (बुध्द भिमगीतांचा बहारदार कार्यक्रम रात्री १२ वाजता भव्य आतिषबाजी दि,१४ रोजी सकाळी ७ वाजता भिमजोत रॅलीचे आगमन, सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण, १२ वाजता भोजनदान व सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक या सर्व कार्यक्रमांचे आयोजन समस्त बौद्ध समाज व जयंती कमिटी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष