मैत्री फौंडेशनच्या वतीने गरीब विद्यार्थीनीला आर्थिक मदतीचा धनादेश

इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

इचलकरंजी शहर व परिसरात आपल्या सामाजिक कामांसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या मैत्री फौंडेशनच्या वतीने अनेक कार्ये आजवर पार पाडण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणी अनाथाश्रम व वृद्धाश्रम इमारती बांधून देण्यात आल्या आहेत. विविध इस्पितळात उपचार घेणारे रुग्ण यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. कोरोना काळातील अन्नधान्य व इतर मदतीचा गौरव म्हणून फौंडेशनला विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शालेय गणवेश वाटप तसेच शैक्षणिक मदत म्हणून विविध शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मदत देण्यात येते. सदर उपक्रमाचा भाग म्हणून इचलकरंजी शहरातील गरीब विद्यार्थिनीला आर्थिक मदतीचा धनादेश मैत्री फौंडेशनच्या वतीने देण्याचा कार्यक्रम नुकताच फौंडेशनचे अध्यक्ष श्री चंद्रप्रकाश छाजेड यांच्या कार्यालयात पार पडला. शुल्क भरण्यास अडचण असणार्या हुशार विद्यार्थिनीला आर्थिक मदत देण्यात आली. सदर मदत दिगंबर खंडेलवाल समाजाचे अध्यक्ष श्री शेषराज पाटणी तसेच इचलकरंजी शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती व व्यापारी श्री विनोद पाटणी, श्री अशोक पाटणी , श्री विनोद गंगवाल, श्री विनोद पाटणी, श्री सुरेश सुराणा यांच्या हस्ते देण्यात आली. मैत्री फौंडेशनच्या या कार्यक्रमात फौंडेशनचे अध्यक्ष श्री चंद्रप्रकाश छाजेड, महिला अध्यक्ष सौ वहिदा नेजकर, व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अशोक खोत सर, फौंडेशनचे सचिव श्री सुहास गोरे, फौंडेशनचे ट्रस्टी श्री श्रीकांत जोशी, श्री बाळासाहेब कुळवमोडे व श्री प्रकाश बलवान व गरजू विद्यार्थिनीचे पालक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष