काळमवाडी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे दूधगंगा नदी प्रवाहित : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

दूधगंगा नदीवर असलेल्या काळमवाडी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे दूधगंगा नदी पात्रातील पाणी प्रवाहित झाले असून लवकरच शिरोळ तालुक्यातील घोसरवाड दत्तवाड व दानवाड परिसरात दूधगंगा नदी पात्रातील पाणी प्रवाहित होईल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, काळमवाडी धरणातून सुरू केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सुळकुड पर्यंत प्रवाहित झालेले पाणी पुढे कारदगा बंधाऱ्याचे बर्गे काढल्यामुळे वेगाने प्रवाहित होत आहे, वाढता उन्हाळ्या मुळे सिंचनासाठी व ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांसाठी मोठ्या प्रमाणात नदी पात्रातून पाण्याचा उपसा होत असल्यामुळे दूधगंगा नदीचे पात्र कोरडे पडले होते, या नदीकाठावरील शेतकरी व ग्रामस्थ यांची सातत्याने दूधगंगा नदी प्रवाहित करावी अशी मागणी होती, याचाच भाग म्हणून आपण पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा करून दूधगंगा नदी प्रवाहित करण्यासंदर्भात काळमवाडी धरणांमधून विसर्ग सुरू करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या शुक्रवारी याची अंमलबजावणी होताना काळमवाडी धरणा मधून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला असल्यामुळे दूधगंगा नदी काठावरील ग्रामस्थांना दूधगंगा नदी प्रवाहित झाल्यामुळे दिलासा मिळणार आहे, असेही आमदार राजेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष