1 जून ची पूर परिषद यशस्वी करा : धनाजी चुडमुंगे
अर्जुनवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कृष्णा वारणा पंचगंगा नद्यांना येणाऱ्या महापुरावर कायमस्वरूपी उपाय योजना व अलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध या दोन मुद्यावर कुरुंदवाड येथील संगम घाटावर 1 जून रोजी होणारी पूर परिषद यशस्वी करावी असे आवाहन आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले येथील शिवाजी चौकात आयोजित सभेत चुडमुंगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव मगदूम होते.
प्रारंभी वयाची शंभरी पार केल्याबद्दल ज्ञानदेव मगदूम यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून धनाजी चुडमुंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सभेत बोलताना ते म्हणाले की कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार यांनी समन्वय ठेऊन अलमट्टी आणि कोयना धरणाचे योग्य परिचलन केल्यास महापूर रोखता येतो हे गेल्या वर्षीच्या अनुभवाने सिद्ध झाले आहे कारण 2021 च्या तुलनेत 2022 ला पाऊस जास्त झाला पण महापूर आला नाही.
यावेळी अक्षय पाटील, कृष्णा देशमुख दिगंबर सकट अमोल गावडे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उद्धव मगदूम यांनी तर आभार रघुनाथ पाटील गुरुजी यांनी मानले.
यावेळी माजी सरपंच प्रकाश चौगुले माजी ग्रामपंचायत सद्दश अनिल सुतार संजय चौगुले बाबासो कदम लक्ष्मण मगदूम शेबीराज हेग्गना गोरख मगदूम आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा