मृत अमिरच्या कुटूंबाला मैत्री फौंडेशनच्या वतीने 10 हजार रुपयांची आर्थिक मदत

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड येथील अमिर बालेचाँद नदाफ या युवकाचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटूंब वार्‍यावर पडले होते, यासाठी सामाजिक क्षेत्रात मदतीची हाक देण्यात आली होती, याची दखल घेवून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या मैत्री फौंडेशनने नदाफ कुटूंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

गेल्या दहा दिवसापूर्वी अमिर नदाफ याचा कोगनोळी येथे संशयास्पद मृत्यू झाला होता, घरात कमवता व्यक्ती वारल्यामुळे घरातील पुर्णतः अपंग असलेले काका, लहान दोन मुलांची जबाबदारी पत्नी फातिमा नदाफ यांच्यावर आल्यामुळे त्यांना मदतीची गरज होती, ही गरज ओळखून इचलकरंजी येथील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले मैत्री फौंडेशनने 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करुन नदाफ कुटूंबाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी मैत्री फौंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाशजी छाजेड, सेक्रेटरी सुहास गोरे, मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे, संतोष तारळे आदी उपस्थित होते. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष