बोरगाव मध्ये चुरशीने 84.40 टक्के मतदान ; सकाळपासून मतदान केंद्रावर रांगाच रांगा



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

निपाणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील 14 मतदान केंद्रातून 11454 जणांनी मतदान केले असून एकूण चुरशीने झालेले मतदान 84.40% मतदान झाले आहे.

सकाळी सात वाजलेपासून सर्वच मतदान केंद्रावर मतदारांची रंगा दिसून आल्या वयोवृद्धीवर जेष्ठ मतदारांना बिल चे व्यवस्था करण्यात आली होती सकाळी आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम रावसाहेब पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानबोरगाव मध्ये एकूण 82.3% मतदान केले.

यंदाच्या निवडणुकीत मतदारसंघातील लोकांना बदल पाहिजे आहे .आपण केलेल्या सामाजिक कार्याचा मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवली होती .कार्यकर्ते हे आमचे पक्षाचे केंद्रबिंदू मानून या सर्वच गोष्टींवर आपण विश्वास ठेवून निवडणूक लढवली असून या निवडणुकीत आपला विजय हा निश्चित असल्याचा विश्वास उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत आई मीनाक्षी, बंधू अभिनंदन, पत्नी धनश्री ,भावजय विनयश्री पाटील उपस्थित होते.

अनेक युवा मतदारांनी पहिल्यांदाच आपला मतदानाचे हक्क बजावून विकास कामांचा व सामाजिक कार्याला साथ देणाऱ्या उमेदवारालाच आपण मतदान केल्या असल्याचा सांगितले. बोरगांव येथील आर के नगर मधिल उतम पाटील कार्यकर्ते नी चालत रॅलीने मतदान क्रेंदावर जाऊन मतदान केले.

अत्यंत शांततेने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा चोख बंदोबस्त ठेवला होता. अत्यंत उत्स्फूर्त मतदान झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. बोरगाव शहराचे उमेदवार उत्तम पाटील असल्याने यांनाच आपण मतदान करणार असल्याचा यावेळी अनेकांनी सांगितले. निपाणी मतदारसंघात यंदा बदल घडवायचा आहे त्यासाठी योग्य उमेदवारला आपण निवडून दिल्याचे काही वयोवृद्ध लोकांनाही सांगितले.

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष