संतुबाई दूध संस्थेच्या चेअरमनपदी अशोककुमार पाटील, व्हा.चेअरमनपदी कऱ्याप्पा ईटाज
.
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील श्री संतुबाई दूध संस्थेच्या चेअरमनपदी अशोककुमार पाटील, तर व्हा.चेअरमनपदी कऱ्याप्पा ईटाज यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी एन.पी. दवडते होते.
गेल्या अनेक वर्षांपासून श्री संतुबाई दूध संस्थेने दूध उत्पादक शेतकरी वर्गाचा विकास साधला आहे. सन १९८८ पासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. या निवडी नंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ संचालक बाळासो माळी, बाबुराव माळी, निंगोंड पाटील, भिमगोंडा पाटील, हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वैभव पाटील, अक्काताई बरगाले, सुनिल पाटील, म्हादगोंडा पाटील, जयश्री पुजारी, सुरेश देबाजे, बंडू पाटील, दिलीप माळी, अशोक पुजारी, दत्तात्रय माळी, तुकाराम माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा