जनरेट्याद्वारे शासनाला महापुरावर उत्तर शोधण्यास भाग पाडू : धनाजी चुडमुंगे
शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क :
स्वातंत्र्य चळवळी मुळे महाशक्ती असलेल्या इंग्रजांना या देशातून जावे लागले, आण्णा हजारे यांनी उपोषणाच्या माध्यमातून अनेक जण हिताचे कायदे करण्यास सरकार ला भाग पाडल्याचा आपल्या समोर इतिहास आहे आपणही पूर परिषदेच्या माध्यमातून जणरेटा निर्माण करून सरकार ला या महापुरावर कायमस्वरूपी उत्तर शोधण्यास भाग पाडू या यासाठी 1 जून रोजीच्या पूर परिषदेस मोठया संख्येने हजर रहावे असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी शिरटी येथील सभेत केले या सभेच्या अध्यक्षस्थानी आलम मुल्लाणी होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात काल झालेल्या सभेत ते पुढे म्हणाले की 2005 मध्ये मुबंई मध्ये सुद्धा महापूर येऊन मोठी जीवित आणि वित्त हानी झाली होती यानंतर तात्काळ सरकार आणि मुबंई महापालिकेने या महापुराची कारणे शोधून उपाय योजना राबवल्यामुळे आज अखेर मुबंई मध्ये पुन्हा महापूर आलेला नाही. 2005 मध्ये आपल्या भागातही महापूर आल्यानंतर सरकार पातळीवर महापूर रोखण्यासाठी प्रयत्न झाले असते तर आपल्या इथेही महापूर आले नसते. सरकारला या महापुरावर कायम स्वरूपी उत्तर शोधायला भाग पाडायचे असेल तर आपल्याला तशी मागणी करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या मोठा जनरेटा उभारला पाहिजे आणि यासाठीच आम्ही 1 जून रोजी कुरुंदवाड संगम घाटावर पूर परिषदेचे आयोजन केले असून सर्वांनी मोठया संख्येने पूर परिषदेला हजर रहावे तरच सरकार याची दखल घेईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
या सभेत कृष्णा देशमुख अमोल गावडे दिपक पाटील यांनी आपले विचार मांडले प्रास्ताविक बजरंग कुंभार यांनी तर पिंटू ढेकळे यांनी आभार मानले. यावेळी राकेश जगदाळे भाऊसो पाटील रुद्राक्ष कांबळे धनु जगनाडे महावीर चौगुले काशिनाथ पुजारी पांडू बंडगर संदीप चौगुले सतीश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा