कुरुंदवाडमध्ये आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने होणार आंदोलन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड शहरातील रखडलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांच्या नेतृत्वाखाली नळ पाणी योजनेच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आज अकरा वाजता आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कुरुंदवाड शहराची नवीन पुरवठा योजना रखडली आहे. अनेक वेळा आंदोलने झाली मात्र प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने कुरुंदवाड शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडला आहे. त्यामुळे कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांच्या नेतृत्वाखाली आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा