जयसिंगपूर येथे रविवारी चार पुस्तकांचे प्रकाशन



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 जयसिंगपूर येथे रविवारी चार पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार व प्रख्यात लेखिका डॉ. तारा भवाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ होत आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जयसिंगपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. महावीर अक्कोळे यांनी दिली. 

संतांचा तो संग नव्हे भलतैसा - डॉ. महावीर अक्कोळे, जैन कथेनंतरची कथा - सौ. सुनेत्रा नकाते, तीर्थंकर भ. महावीर वर्धमान - प्रा. डॉ. बाबा बोराडे आणि आचार्यश्री आर्यनंदी जीवनगाथा - स्व. सुमेरचंद जैन यांची ही चार पुस्तके आहेत. 

हा कार्यक्रम जयसिंगपूर महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये रविवारी (दि.21) सायंकाळी चार वाजता आयोजित केला आहे. तरी साहित्य प्रेमींनी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. अक्कोळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष