जानकी वृद्धाश्रमाचे बाबासाहेब पुजारी यांना डॉक्टरेट प्रदान
घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गेली १७ वर्षे जानकी सोशल फाउंडेशन व जानकी वृद्धाश्रम च्या माध्यमातून बाबासाहेब पुजारी यांनी सामाजिक बांधिलकी जोपसली, वेगवेगळे सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडले, वेगवेगळ्या गावात सामाजिक प्रबोधन पर व्याख्याने घेऊन समाजात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत, गो संवर्धन केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र, सेंद्रिय शेती असे वेगवेगळे चांगल्या पद्धतीने राबवत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंटरनॅशनल युसी एज्युकेशन कौन्सिल फ्रान्स विद्यापीठाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
तामिळनाडू येथील सालेम येरकूट मधील हॉटेल आराधना - ईन सेव्हन स्टार सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत डी-लिट प्रदान चा शानदार सोहळा झाला. यावेळी विद्यापीठाचे प्रमुख विश्वस्त तसेच मान्यवर उपस्थित होते. या समारंभात इंटरनॅशनल युसी एज्युकेशन कौन्सिलचे
संस्थापक चेअरमन डॉ. एम आय प्रभू, विद्यापीठ कौन्सिल अँम्बीसिटर डॉ. समोचिना इलिना यांच्या हस्ते बाबासाहेब पुजारी याना सन्मानपूर्वक डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर डॉ. गणेश वाईकर, हेल्पिग प्लाम्स फाउंडेशन कर्नाटक डायरेक्टर डॉ कविता कारामिने,
तमिळनाडू एज्युकेशन डिपार्टमेंट सेक्रेटरी
डॉ स्वेता जीवननाथम, तुतीकोरिन डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉ एम शेथलकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा