दत्तवाडच्या अक्षयचे 'यूपीएससी' त ६३५ वी रँक

इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

दत्तवाड (ता. शिरोळ) येथील अक्षय अशोक नेरले यांनी संघ (केंद्रीय) लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ६३५ वी रँक मिळवून लखलखीत यश मिळवले आहे. यापूर्वीही अक्षयने दोन वेळा परीक्षा दिली होती. परंतु परीक्षेत अपयश येऊन सुद्धा खचून न जाता तिसऱ्या वेळी तयारी करून त्यांनी ही परीक्षा दिली होती. गावातील यूपीएससी परीक्षा पास होणारा तो पहिलाच विद्यार्थी आहे. या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला.

 विशेषत: अक्षयने प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिरामधून पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण नेजे हायस्कूल मध्ये झाले आहे. त्यांनी घोडावत इंजीनियरिंगमधून बी.ई.ची पदवी घेतली आहे. अक्षय चे वडील अशोक नेरले हे माजी सैनिक आहेत. आई-वडिलांचे संस्कार आणि गुरुजनांनी दाखवलेला मार्ग हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे मत अक्षय नेरले यांनी व्यक्त केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष