सर्वसामान्यातील सामान्य आमदार निवडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम रावसाहेब पाटील यांचे आवाहन
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
चांदशिरदवाड ता निपाणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम रावसाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा व रॅली काढून "घड्याळ" या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
मी सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्ताच आहे आणि कार्यकर्त्यांचा जीवावर ही निवडणूक लढवली आहे . सामन्यांची कळवळ आपणास आहे. तरी मतदारांनी सर्व सर्वसामान्यातील सामान्य माणसाला आमदार करण्यासाठी मला विजयी करावे असे सांगितले.
यावेळी अनेक मान्यवरांचे मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत, रामगोंडा पाटील, उपाध्यक्ष सौ जयश्री पाटील,जिवंधर फिरगन्नवर, ग्रामपंचायत सदस्य विजय रोहिदास, यास्मिन चाऊस, मा. ता. प.सदस्य समीर चाऊस, वीरश्री पाटील ,शाहीरा मुजावर, प्रकाश पाटील, कुमार पाटील, किरण कांबळे ,राजू शिंगे, आप्पासो कोल्हापुरे, चिंतामणी पाटील, सुभाष पाटील, गुंडुराव पाटील, संदीप खोत, राजू खोत, गोटू पाटील, राजेंद्र पाटील, बाळकृष्ण रूपाळे, पद्मराज पाटील,बाळू मड्डे, गजु मगदुम, आदगोंडा पाटील, दादा कोनिंगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, कट्टा बाईज, देवा ग्रुपचे सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा