समाजवादी पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी दत्ताजी यादव

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

राष्ट्रीय समाजवादी पार्टी एन.एस.पी. च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दत्ताजी यादव यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित आपटे यांच्याहस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीनंतर यादव यांचा सत्कार करण्यात आला. यादव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची या पदी निवड करण्यात आली. पक्षवाढीबरोबर सामाजिक कार्यात अग्रक्रमाने कार्यरत राहण्याची ग्वाही यादव यांनी यावेळी दिली. यावेळी राज्य अध्यक्ष रवी कांबळे, राष्ट्रीय महासचिव लक्ष्मण चांदेर, मॅन्युअल फेस्ट कमिटी अध्यक्ष फॉरेन गोविंद भावे, राष्ट्रीय संपर्क प्रमुख  हेमंतकुमार केळकर, चित्रा कदम, शरणाप्पा हळ्ळीजोळ, स्मिता देशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन शिरीष काळे तर अशोक वाघमारे यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष