देवदर्शनासाठी मुलाच्या गाडीवरून जात असताना मातेचा अपघाती मृत्यू
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कागल-निढोरी मार्गावर केनवडे नाजिक असणाऱ्या वाघजाई घाटात मोटारसायकल व कारगाडीची समोरा समोर धडक होऊन अपघातात बोरगावची महिला जागीच ठार झाली.
अधीक माहीती अशी की संगीता सुनिल कुंभार ( वय ४० , रा . कुंभार माळ बोरगाव , ता . निपाणी ) असे मृत महिलेचे नाव आहे .तर मोटार सायकल चालक शुभम सुनील कुंभार ( वय २० ) हा जखमी झाला आहे .
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,बोरगाव येथील संगीता कुंभार ह्या आपला मुलगा शुभम यांच्या मोपेड मोटार सायकल वरून देवदर्शनासाठी आदमापुरला चालल्या होत्या .दरम्यान कागलच्या दिशेने जानाऱ्या कारगाडीला.मोटारसाकलीवरून अधिक वेगाने जाणाऱ्या शुभम ने कार गाडीच्या डाव्या बाजूला जोराची धडक दिल्याने मोपेडवरील संगीता कुंभार या खाली कोसळल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबत शुभम कुंभार याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.कागल पोलीस अधिक तपास करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मयत संगीता कुंभार ह्या बोरगाव येथील कनड प्राथमिक शाळेत अक्षरदासू योजनेत काम करत होत्या. विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन यामध्ये त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, एकंदरीत शाळेतील त्यांचा परोपकारी स्वभाव हा वाखाणासारखा होता , त्यांच्या अकाली निधनाने बोरगांव सह परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे, देवाच्या दर्शनाला जात असताना मुलाच्या डोळ्यासमोरच आईचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा