शिरोळ चे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास माळगे भास्कर अवॉर्ड ने सन्मानित
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ चे सामाजिक कार्यकर्ते व स्थावर मालमत्ता मार्गदर्शक श्रीनिवास माळगे यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या नामांकित पत्रकार संस्थेकडून राष्ट्रीय भास्कर अवॉर्ड
प्रदान करण्यात आला. गोवा येथील रवींद्र भवन साखळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दि प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड हा शानदार सोहळा झाला. जेष्ट साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी होते. माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व इस्टेट डेव्हलपर्स श्री माळगे यांना कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन भास्कर अवॉर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले.
या समारंभास महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे प्रमुख राजीव लोहार ,सदस्य डॉ दगडू माने, ॲड रणजितसिंह राणे ,अभिजीत पाटील, आदर्श शिक्षक दिलीप चौगुले यांच्यासह माजी सरपंच शिवाजीराव माने -देशमुख, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने आदी उपस्थित होते.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते माळगे यांनी अल्प दरात मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी घडविले आहेत .सामान्य गोरगरीब ,निराधार व वयोवृद्द्धांना पेन्शन मिळवून दिली असून स्थावर मालमत्ता मार्गदर्शकपर सेवा देताना त्यांनी निवासी कारणासाठी अल्पदरात प्लॉट व जागेची उपलब्धता करून दिली आहे. कन्सल्टिंग मध्ये लोकांना प्रॉपर्टी बद्दल योग्य सल्ला देऊन सामान्य नागरिकाची अशा व्यवहारात फसगत होऊ नये यासाठी मोफत व योग्य मार्गदर्शन देत आहेत .अनेक गरीब व गरजू कुटुंबांना आधार देत कोरोना तसेच महापुराच्या काळात सहकारी मित्रांना सोबत घेऊन त्यांनी गरीब व निराधार घटकांना मदत केली आहे.
---------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा