आलासमध्ये आरोग्य यंत्रणेचे काम युध्दपातळीवर ः सरपंच सचिन दानोळे
![]()  | 
| आलासमध्ये चिकनगुनियाच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभागाच्या वतीने सुरु असलेली जनजागृती | 
आलास / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या अनेक महिन्यापासून गावामध्ये चिकनगुनियासृद्ष्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत, या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाच्या वतीने युध्दपातळीवर उपाययोजना राबविण्याचे काम सुरु करण्यात आले असून जोपर्यंत चिकनगुनिया आजार गावातून हद्दपार होत नाही, तोपर्यंत धुर फवारणी, औषधोपचार तसेच जनजागृती सुरु ठेवून नागरीकांचे आरोग्य अबाधित राखणार असल्याची माहिती आलासचे सरपंच सचिन दानोळे यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या महिन्याच्या मागे गावात चिकनगुनिया आजाराचे रुग्ण जास्त होते, आता हळू-हळू ही संख्या आटोक्यात आणण्यात यश येत आहे, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे अधिकारीही येवून विविध उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, चिकनगुनिया हा आजार एकदा झाला की सहा महिने राहतो, त्यामुळे लोकनींही काळजी घ्यावी, आपल्या घरातील बॅरेल, टँक, फ्रिज वेळोवेळी स्वच्छ ठेवून कोरडा दिवस पाळावा, जर कोणालाही चिकनगुनिया सारखा त्रास जाणवत असेल तर त्यांनी तातडीने गावातील आरोग्य उपकेंद्रात जावून मोफत औषधोपचार घ्यावा, तसेच ग्रामपंचायतीमध्ये एकच स्वच्छता कामगार असल्याने त्याच्यावर ताण पडत असल्याने बाहेरील स्वच्छता कामगार आणून गावातील स्वच्छता मोहिम राबविणार असल्याचे सांगितले. यासाठी ग्रामस्थांनी चिकनगुनियाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाप्रमाणे ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाला सहकार्य करुन हा आजार कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करुया, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा