विधवा प्रथा बंदीसाठी प्रयत्न केलेल्या महिलांना पुरस्कार द्या : अमोल कांबळे
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अशा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दोन महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमिवर विधवा प्रथा मोडित काढून संपूर्ण देशात हेरवाडचे नांव लौकिक करणार्या महिलाच या पुरस्काराच्या मानकरी आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतीने अशा महिलांची निवड करून पुरस्कार द्यावा अशी मागणी माजी उपसरपंच अमोल कांबळे यांनी केली आहे.
यावेळी बोलताना अमोल कांबळे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव मागविले आहेत. मात्र विधवा प्रथा बंद करण्यासाठी पहिल्यांदा ठराव करणारी हि महिलाच होती, आणि याची प्रथम अंमल बजावणी करणारीही महिलाच होती, त्यामुळे अशा महिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने चेहरे पाहून पुरस्कार देण्यापेक्षा योगदान पाहून पुरस्कार द्यावे, असे आवाहन माजी उपसरपंच अमोल कांबळे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा