स्वातंत्र सेनानी कै. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन बँकेच्या मलकापुर व बत्तीस शिराळा नवीन शाखेचे उत्साहपुर्ण वातावरणात उद्घाटन सोहळा संपन्न
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
स्वातंत्र सेनानी कै. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप बँकेच्या मलकापुर ता. शाहुवाडी व बत्तीस शिराळा ता. शिराळा शाखेचे उद्घाटन सोहळा दि. २८ एप्रिल २०२३ व दि. ३० एप्रिल २०२३ रोजी उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाले. बँकेच्या मलकापुर शाखेचे नामफलकाचे उद्घाटन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे हस्ते झाले प्रवेशद्वाराचे उद्घाटन वारणा सहकारी बँकेचे चेअरमन व कोल्हापुर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे चेअरमन मा. श्री. निपुण कोरे यांचे हस्ते पार पडले. शाखेचे स्ट्रॉंगरूम व लॉकर उद्घाटन माजी कृषी विद्यावेत्ता (प्रमुख), प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी) मा. श्री. डॉ. दिलीप नागावेकरसो यांचे हस्ते पार पडला. सदर उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती मा. श्री. प्रवीण बेर्डेसो मा. श्री. शेषमल कर्नावटसो, मा. श्री. सुबोध भिंगार्डेसो मा. श्री. आर. एस. पाटीलसो. मा. श्री. शंकर मानेसो, मा. श्री. जयंत खटावकरसो, मा. श्री. सुरेश पांडुरंग पोतदारसो, मा. श्री. विजय भिंगार्डेसो, मा. श्री. सतीश कोठावळेसो मा. अशोक जाधव सर हे होते. सदर उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मा. श्री. नरेंद्र पाटील यांनी आण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्रात पुढे येण्यासाठी सहकार्य केले जात आहे. स्वातंत्र सेनानी के. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. मराठा समाज उद्योगी झाला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले त्यांनी आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करिता व्याज परताव्याचा लाभ मिळणार आहे. त्याचा अधिक तरुणांनी लाभ घ्यावा असे म्हटले. बँकेचे कुटुंब प्रमुख श्री. अरुण आलासे यांनी शाश्वत शेतीकडे तरुणांना आकर्षित करणेकरीता मसाला शेतीचा आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेमध्ये समावेश करावा अशी मागणी केली त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
वारणा बँकेचे चेअरमन श्री. निपुण कोरे यांनी मार्गदर्शन केले. बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील यांनी बँकेच्या माध्यमातुन समाजातील घटकांना विनम्र आणि तप्तर सेवा देण्याचा मानस आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातुन तरुणांना उद्योजकांना सहकार्य केले जाणार आहे. याचा परिसरातील उद्योजक तरुणांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमास बँकेचे सीईओ श्री. कनवाडे साहेब, कर्मचारी वर्ग व मलकापुर शहरातील ग्रामस्थ, व्यापारीवर्ग उपस्थित होते. आभार श्री. महादेव धनवडे, संचालक यांनी मांडले.
बँकेच्या शिराळा शाखेचे नामफलकाचे उद्घाटन मा. आमदार श्री. मानसिंगराव नाईकसो यांच्या हस्ते व शाखेचे प्रवेशद्वाराचे उद्घाटन मा. श्री. पी. आर. पाटीलसो अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साखर संघ यांचे हस्ते पार पडले. शाखेचे स्ट्रॉगरूम व लॉकर उद्घाटन मा. श्री. संपत खिलारीसो, उपविभागिय अधिकारी तथा दंडाधिकारी वाळवा व मा. श्री. विशाल पाटीलसो जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ यांचे हस्ते पार पडले. सदर उद्घाटन सोहळ्यास मा. श्री. विवेक कुलकर्णी (सागावकर), मा. श्री. के. आर. पाटील, मा. श्री. जगन्नाथ कबाडे मा. श्री. शंकर सोनटक्के, मा. श्री. सुनील हसबनीस, मा. श्री. अधिक पाटील, मा. श्री. हारुण मणेर, मा. श्री. विठ्ठल
नलवडे, मा. श्री. वसंतराव पाटील (आबा ) मा. श्री. बाळकृष्ण धुमाळ जागामालक उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक मनोगतामध्ये बँकेचे चेअरमन मा. श्री. प्रदीप पाटील यांनी बँकेच्या ठेवी सध्या रु. ३१५ कोटी कर्जे रु. १८५ कोटी इतके आहेत. बँकेने प्रती वर्षी नफा व सभासदांना प्रती वर्षी लाभांश दिला आहे असे प्रतिपादन केले. त्यानंतर बँकेचे कुटुंब प्रमुख मा. श्री. अरुण आलासे यांनी बँकेमध्ये आव्हाने भरपुर आहेत प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी खुप आहेत त्याप्रमाणे त्या भागातील अडचणी ओळखुन बँकिंग व्यवसाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे बँकेने पश्चिम घाटामध्ये शाखत शेती व स्वावलंबी तरुण निर्माण करणेकरिता बँकेनी शाखा उगडली आहे. बँकेबरोबर इथला शेतीकारी हि मोठा झाला पाहिजे याकरिता बँकेचा मसाला शेती वाढविणेकरिता प्रयत्न राहील. तरुणांनी आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे त्यांनी विचार मांडले. यानंतर मा. श्री. विशाल पाटीलसो यांनी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेची माहिती सांगितली. उपवीभागीय अधिकारी तथा दडाधिकारी मा. श्री. संपत खिलारीसो यांनी बँकेचे कार्य, संचालक मंडळ यांचेविषयी माहिती दिली. त्यांनी शिराळा भाग, चांदोली धरण, चांदोली अभयारण्य याचा विचार करून इतर विविध योजना राबवणे आवश्यक असेलेचे म्हटले. मा. आमदार श्री. मानसिंग नाईकसो यांनी बँकेच्या कार्याबद्दल गौरवोद्वार काढले. शेतक-यांना मदत करण्याचा दृष्टीकोन बँकेचा व संचालक मंडळाचा आहे. बँकेने शेतक- यांच्या मागे ताकदीने रहायला हवे असे प्रतिपादन केले. सदर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.पी. आर. पाटीलसो यांनी नागरी सहकारी बँकांनी शेतकरी, उद्योजक यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवुन आणले आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा