पदवीधर शिक्षक संघटना सोलापूरचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र बिराजदार यांची दत्त उद्योग समूहास भेट
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
पदवीधर शिक्षक संघटना सोलापूरचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र बिराजदार यांनी श्री.दत्त सहकारी साखर कारखाना दत्तनगर,शिरोळ येथे सदिच्छा भेट दिली.
दत्त उद्योग समूहाचे चेअरमन,उद्यान पंडित गणपतराव पाटील (दादा) यांची भेट घेवून चर्चा केली. याप्रसंगी शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे मा.चेअरमन - दिलीप शिरढोणे,पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष -शिवाजीराव ठोंबरे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटना अहमदनगर चे उपाध्यक्ष -रमेशकुमार मिठारे, शक्तीजीत गुरव,शुभम शिरढोणे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा