जांभळीच्या नूतन सरपंच अरुणा कोळी यांचा सत्कार
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
जांभळी गावच्या नूतन सरपंच सौ.अरुणा केशव कोळी यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार दिलीप कोळी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाचे सचिव -रमेश शंकर कोळी,हेरवाडचे सामाजिक कार्यकर्ते उत्कर्ष सुभाष तराळ शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे मा.चेअरमन दिलीप शिरढोणे उपस्थित होते.
अरूणा कोळी ह्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत लोकोपयोगी विकासकामामुळे आपला एक वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी होतील. असा विश्वास व्यक्त करून शुभेच्छा देण्यात आल्या.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा