नवे दानवाडमध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यातनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन



प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

नवे दानवाड येथे प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त संयुक्त हनुमान तालीम नवे दानवाड यांच्या मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवामध्ये सकाळी ठिक ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन,सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकलच्या मागे श्वान पळविणे स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता पारंपारिक पध्दतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन संयुक्त हनुमान तालीम मंडळ नवे दानवाड व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष