हेरवाड चर्मकार समाजाच्या सभागृहासाठी 15 लाखांचा निधी : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील चर्मकार समाजाच्या सभागृहासाठी माजी आरोग्य राज्यमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून १५ लाखाचा निधी मंजूर केल्याबद्दल हेरवाड येथील चर्मकार समाज बांधवांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, हेरवाड बरोबर शिरोळ तालुक्यातील चर्मकार समाजाच्या विकासासाठी लागेल तो निधी मंजूर करून समाजाचा विकास साधणार असल्याचे सांगितले.
यावेळी चर्मकार समाजाचे अर्जुन जाधव, जितेद्र माने, शंकर माने, संजय माने, नंदकुमार धुमाळे, प्रमोद माने, पुंडलिक माने, विलास माने, सुनिल माने, रमेश माने, अभिजित माने, विनोद माने, प्रमोद माने यांच्यासह चर्मकार समाजातील बांधव होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा