पत्रकार रंगराव बन्ने हे "आयुष्याच्या हिंदोळ्यावर डॉ.न.ना.देशपांडे " ह्या उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्काराने सन्मानित

 

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बारवाड (ता.निपाणी)  येथील दै.तरुण भारतचे जेष्ठ . पत्रकार व कवी, साहित्यिक रंगराव बन्ने यांना त्यांच्या "आयुष्याच्या हिंदोळ्यावर "या कविता संग्रहास कोल्हापूर येथे करवीर नगर वाचन मंदिरात नरेंद्र विद्यापीठ संस्था, स्व. डॉ.न.ना.देशपांडे राशिवडेकर स्मृती समिती,सेवाव्रती जानकी न.जोशी खडकलाटकर स्मृती समिति आणि स्व.वा.गो.तथा डब्ल्यू जी कुलकर्णी चिक्कोडीकर स्मृती समिती यांच्यावतीने डॉ.न.ना.देशपांडे राशिवडेकर उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

     रंगराव बन्ने हे १९८७ पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे तीन कथा संग्रह,दोन कविता संग्रह,एक वारकरी सांप्रदायावर व एक धनगर समाजावर एक अशी सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत दरम्यान या छंदापोटी अनेक काव्य रचना निर्माण केले आहेत,  .त्यातीलच एक असलेल्या " आयुष्याच्या हिंदोळ्यावर " या कविता संग्रहास हा पुरस्कार ऐतवडे बी. टी.कॉलेजचे माजी प्राचार्य श्री नाईकनवरे,जेष्ठ समीक्षक राजू उर्फ चंद्रकांत पोतदार,नरेंद्र विद्यापीठ संस्थेचे अध्यक्ष अरविंद देशपांडे,पी. एन.देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  

       यावेळी वीणा कुलकर्णी,गिरिजा गोडे,शिवकुमार तोडकर,सुनील करगुप्पिकर,दीपा देशपांडे,मकरंद देशपांडे,मंगल देशपांडे,कारदग्याचे बाळासो नाडगे,तातोबा बत्ते,कुमार हेगडे,संजय अवघडी,सिद्धाप्पा गावडे, नेमिनाथ हजारे, सत्याप्पा बन्ने,रावसाब ढोणे,सुनीता बन्ने,सातवा कगुडे,मंगल कोळी,राधा परिट,भाग्यश्री हजारे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थितीत होते.सदरचा मानांकित पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार रंगराव बन्ने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष