शांतिनिकेतनमध्ये शाहू जयंती निमित्त विद्यार्थी पैलवानांनी मैदान गाजवले...

 

विद्यार्थ्यांच्या आगळ्यावेगळ्या कुस्त्या;थोरात अकॅडमीचा उपक्रम



माधव नगर / शिवार न्यूज नेटवर्क :

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात अकॅडमी शांतिनिकेतन सांगली यांच्यावतीने आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात युवा विद्यार्थी मल्लांच्या नव्वद कुस्त्या पार पाडल्या.यावेळी मुलींच्या कुस्त्या प्रेक्षणीय झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. विजेत्या सर्व मल्लांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

या मैदानाचे पूजन ऑल इंडिया चॅम्पियन पै. संभाजी तात्या सावर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अकॅडमीच्या इन्चार्ज समिता पाटील, पै.सुनील चंदनशिवे, पै. विश्वास पाटील आदी उपस्थित होते

छत्रपती शाहू महाराजांचे कुस्तीचे कार्य टिकवण्यासाठी, अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचे मन मनगट मेंदू मजबूत करणे काळाची गरज आहे. थोरात अकॅडमीत शाहू जयंतीनिमित्त एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने कुस्तीचे मैदान आयोजित करून शाहुराजांना अभिवादन करणारी महाराष्ट्रातील थोरात अकॅडमी एकमेव आहे असे गौरवोद्गार पैलवान संभाजी तात्या सावर्डेकर यांनी उद्घाटन समारंभावेळी व्यक्त केले.

यावेळी सदर कुस्ती मैदानात लहान, मध्यम, मोठ्या गटातील विद्यार्थ्यांच्या कुस्त्या हिंदकेसरी मारुती माने कुस्ती आखाड्यात पार पडल्या.

सदर विजेत्या मल्लांना संस्थेचे संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात.डी एस माने यांनी अभिनंदन केले. मैदानाचे खुमासदार निवेदन मोहन कोळेकर व रणजीत आवळे यांनी केले.थोरात अकॅडमीचे सर्व शिक्षक,कर्मचारी आदींनी मैदान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष