विविध सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल इचलकरंजी लायन्स क्लबबद्दल १५ बक्षिसे
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
लायन्स इंटरनॅशनल या संस्थेच्या 3234 D1 या प्रांतातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, व सातारा या सहा जिल्हातील 87 क्लब चा प्रांतीय कर्तुत्व गौरव हा बक्षीस वितरण सोहळा वरद मंगल कार्यालय सांगली येथे संपन्न झाला.
या समारंभामध्ये लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीला विविध सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल १५ बक्षिसे देऊन सन्मानित केले.
यामध्ये महेंद्र बालर (बेस्ट प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रीक्ट), संदीप सुतार (बेस्ट ट्रेजरर ऑफ डिस्ट्रीक्ट), सौ.कनकश्री भट्टड (बेस्ट लायन लेडी ऑफ डिस्ट्रिक्ट),विजयकुमार राठी (विशेष सन्मानित)
बेस्ट हंगर रिलीफ, बेस्ट स्क्रॅप बुक , बेस्ट फोटो काँटेस्ट, क्लब बुलेटिन काँटेस्ट , बेस्ट फंड राईसिंग प्रोग्राम , बेस्ट डिजी व्हीजिट , बेस्ट अक्टिविटी महिला मॅराथॉन,बेस्ट अक्टिविटी महिला नमो नारी, डिस्ट्रिक्ट हंगर ॲक्टिविटी, बेस्ट स्क्रॅप बुक मल्टिपल आवार्ड देवून गौरवण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा लायन्सचे प्रांतपाल राजशेखर कापसे व त्यांचे सहकारी यांचे हस्ते झाला.
या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी चे प्रेसिडेंट महेंद्र बालर , संदीप सुतार , लक्ष्मिकांत भट्टड, महेश सारडा, राकेश धुत,नंदकुमार बांगड, अरुण पाटील , ओम आगरवाल, कनकश्री भट्टड, कांता बालर, स्वाती राठी, संगीता सारडा तसेच प्रांतातील सर्व लायन क्लब चे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा