बोरगाव येथून कामगार बेपत्ता
बोरगांव / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव तालुका निपाणी येथील चिरमुरे भट्टीतील कामगार बोरगाव सर्कल पर्यंत जाऊन येतो असे सांगून गेलेला कामगार बेपत्ता झाला आहे
या बाबत माहिती अशी की बोरगाव बेडक्याळ रस्ता लगत बोरगाव येथे बतुल मोहन पोल ( रेडी ) यांच्या मालकीची रेड्डी चिरमुरे भट्टी कारखाना आहे ,सदरच्या कारखान्यात आंध्र प्रदेश व हैदराबाद मधून कामगार काम करण्यासाठी आलेले आहेत, बालकाशया पिरया केतरेडी , वय वर्ष 38, मुळगाव लिंगमंगुटला तालुका कन्नगिरी जिल्हा प्रकाशम, राज्य , आंघद्रप्रदेश . हा इसम १६ जून 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजता बोरगाव सर्कल मधून फिरून येतो म्हणून चुरमुरे भट्टीतून निघून गेलेला आहे
आजतागायत हा इसम भट्टीकडे परत आलेला नाही . रेडी चिरमुरे भट्टीचे मालक श्री बत्तूल मोहन पोल यांनी याबाबत मिसिंग केस म्हणून नजीकच्या सदलगा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल केली आहे, बेपत्ता इसम यांची उंची 5' 3" असून लांबट चेहरा, काळे केस ,लांब नाक असून अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेला आहे ,सदरच्या इसमाला हिंदी व तेलगू भाषेचे ज्ञान आहे अशा वर्तनाचा इसम आढळल्यास सदलगा पोलीस स्टेशन व रेड्डी चिरमुरे भट्टी केंद्र बोरगाव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा