श्री दत्त महाविद्यालयामध्ये माई पुरस्कार व नवागतांचे स्वागत समारंभ उत्साहात संपन्न


कुरुंदवाड / शिवार न्युज नेटवर्क 

   नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड मध्ये माई पुरस्कार व नवागतांचे स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलन व सौ. सरोजताई पाटील (माई) यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

    या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.जे.पाटील सर यांनी केले. 2023-24 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता 11 वी आर्ट्स,कॉमर्स,आणि सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत प्राचार्यांनी केले. त्याचबरोबर विद्यार्थी मनोगत व गुणवंत विद्यार्थी बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे,अध्यक्ष यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख प्रा.श्री.आर.आर टाकमारे सर यांनी करून दिली, शालेय समिती अध्यक्ष रावसाहेब पाटील (मामा) व शालेय समिती सदस्य घोरपडे वहिनी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे कार्यकारिणी सदस्य मा.श्री.शिवाजी पाटील (दादा) व शांतिनिकेतन कॉम्प्युटर अकॅडमीच्या इन्चार्ज डॉ.सौ.पुष्पलता पाटील मॅडम या उपस्थित होत्या. सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असल्यास काळानुरूप अपडेट राहण ही आजची गरज आहे. त्याचबरोबर फिजिकल फिट राहा. योगा आणि मेडिटेशन याचीही आपण सवय करून घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना डॉ. पुष्पलता पाटील मॅडम यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते माई पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत असताना मा. श्री रावसाहेब पाटील (मामा) यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोहर देण्यात आला.

    कार्यक्रमाचे आभार श्री. आर.डी.पाटील सर यांनी केले.सूत्रसंचालन सौ .आर.आर.पाटील व कु.टी.बी.माने यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊ पाटील, कार्याध्यक्ष गणपतराव पाटील (दादा) उपसंचालक मा.श्री डी.एस. माने साहेब व मा.बी.आर. थोरात साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष