शिरोळच्या श्रेया शर्माला सामाजिक न्याय विभागाचा राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

        सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून महाविद्यालय,तालुका,जिल्हा तसेच विभागातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता योजनेचा लाभ देण्यात येतो. या पुरस्काराचा लाभ शिरोळ येथील श्रेया राजेश शर्मा या विद्यार्थिनीला देण्यात येणार आहे. कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात श्रेया हिला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

      श्रेया हिने मार्च २०२२ मध्ये झालेल्या १२ वीच्या परीक्षेत कोल्हापूर बोर्डात ९५.३३ टक्के गुण मिळविले असून गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून ती संपूर्ण राज्यात प्रथम आली आहे. श्रेयाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जयप्रभा इंग्लिश मिडीयम स्कूल जयसिंगपुर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण डिकेटीई अकॅडमी इचलकरंजी येथे झाले आहे. ती सद्या बिटेकच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष