हरिनामाच्या गजरात रंगले देवपुष्पचे बाल वारकरी
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आळंदी देहू पासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरला जातात. वारीची ही परंपरा, संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती मुलांना समजावी तसेच प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा याकरिता हेरवाड येथील देवपुष्प इंग्लिश मिडियम स्कूलच्या बालचमूंची काढण्यात आलेली दिंडी आकर्षण ठरली.
यामध्ये बालचमूंनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, जनाबाई, नामदेव, सोपानदेव यांची वेशभुषा करुन सहभागी झाले होते. दिंड्या पताका हातात नाचवीत, विठुरायाचा व ग्यानबा तुकारामाचा गजर करत सदरची दिंडी काढण्यात आली.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा