बहुजन समाज पार्टी कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी महेश कांबळे

 


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 बहुजन समाज पार्टी कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी महेश मारुती कांबळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र प्रदेश प्रभारी तथा पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी हुलगेशबाई चालवावी यांच्या हस्ते देण्यात आले.

बहुजन समाज पार्टी शिरोळ तालुका अध्यक्ष पदाच्या माध्यमातून महेश कांबळे यांनी विशेष कार्य करून पक्ष वाढीसाठी मोलाची कामगिरी बजावली असून याची दखल घेऊन त्यांची बहुजन समाज पार्टी कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी प्रदेश महासचिव सुदीप  गायकवाड, कोल्हापूर जिल्हा बामसेफ संयोजक श्याम पाखरे, संदीप कांबळे, दिलीप कांबळे, मोहन कांबळे  व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष