सहकारभूषण एस. के .पाटील महाविद्यालय कुरुंदवाड मध्ये 11 वी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
कुरूदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सहकारभूषण एस. के .पाटील महाविद्यालयात 11कला /वाणिज्य आणि विज्ञान वर्गाचा स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या मुख्याध्यापीका श्रीमती आर . आर. निर्मळे उपस्थित होत्या ,कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाची प्रभारी प्राचार्य डॉ. आर एस कदम त्याचबरोबर महाविद्यालयाचे जूनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.आर एस सावगावे, अधीक्षक बिडकर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत गायकवाड यांनी केले .तर प्रास्ताविक साठे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी जीवन जगत असताना येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर कसे सामोरे जावे, समाजामध्ये अशी विविध उदाहरणे आहेत की आपल्या परिस्थितीवर कारणे न सांगता मात करून यश संपादन केले आहे अशा स्वरूपाची विविध उदाहरणे त्यांनी देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केले.
चंद्रयान-३ च्या यशस्वी उड्डाण व त्यामागील उद्देश व भारतीय खगोल शास्त्रज्ञांच्या बद्दल माहिती पाटोळे सरांनी दिली व अभिनंदनचा ठराव संमत केला. कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बरोबरीने महाविद्यालयाचे माता- पालक संघाचे नवनियुक्त सदस्य उपस्थित होते, त्यांचेही या निमित्ताने स्वागत सत्कार आयोजित केले होते.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसले व कागले मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ.ए.के पाटील मॅडम यांनी मांडले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा