महापूराच्या पार्श्वभूमिवर 28 गावातील शाळांना सुट्टी जाहीर
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापुरात पुराचा धोका निर्माण झाला असून पूरग्रस्त भागातील 28 गावातील शाळांना उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.शाळांचा वापर पूरग्रस्त छावण्यासाठी करण्यात येणार आहे. तसंच पाणी वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.पूरग्रस्त २८ गावातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शाळांना देण्यात आलेली सुट्टी पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे असंही प्रशासनाने सांगितलं आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा