थायलंड येथील आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्या जाधवला उपविजेतेपद
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता १० वी च्या वर्गात शिकत असणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव हिला थायलंड या देशातील नोंतबुरी या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर टेनिस जे ६० या स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. सदर स्पर्धा १९ जून ते २४ जून दरम्यान झाल्या. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन यांच्या मार्फत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धा थायलंड या देशात पार पडल्या.
१८ वर्षाच्या आतील मुलींच्या गटात ज्युनिअर टेनिस जे ६० डबल या स्पर्धेत ऐश्वर्या जाधव व प्रिशा शिंदे या उपविजेत्या ठरल्या. अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. या सामन्यात उपविजेतेपद प्राप्त करत ऐश्वर्याने भारत देशाचे व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले. विम्बल्डन खेळाडू, कोल्हापूरची कन्या ऐश्वर्या जाधव हिचे टेनिस खेळावरील प्रभुत्त्व वाखाणण्याजोगे आहे. तिने यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. अध्यक्ष श्री संजय घोडावत , विश्वस्त श्री. विनायक भोसले, संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी या यशाबद्दल ऐश्वर्याचे कौतुक केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा